श्री मौनी महाराज
![]() |
श्री मौनी महाराज |
मौनी महाराज : (सु. सतरावे शतक). एक शिवकालीन महाराष्ट्रीय सत्पुरुष,
मौनी महाराज पाटगांव येथे आल्यानंतर धर्ममार्तंडांच्या छळाला कंटाळून त्यांनी मौन धारण केले. त्यामुळे त्यांना ‘मौनी’ हे नाव मिळाले. त्यांना मौनी बाबा वा मौनी बुवा असेही म्हणत. ते उत्तूर (ता. आजरा, जि. कोल्हापूर) या गावाहून आले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील रांगणा किल्ल्याजवळील पाटगाव (ता. भुदरगड) या गावी वास्तव्य करून राहिले.
मौनी महाराज मठ पाटगांव (सभा मंडप )
मौनी बाबांच्या पूर्वायुष्याबद्दल माहिती मिळत नाही. त्यांच्या मठातील जीवनक्रम नाथपंथांपैकी अवधूत उपपंथाशी काहीसा मिळता-जुळता होता. गोसाव्यांच्या ‘गिरी’ नावाच्या पंथाशी त्यांचा संबंध असण्याचाही संभव आहे.
![]() |
सभा मंडपातील आतील भाग |
मौनी महाराज कथाकीर्तनाच्या माध्यमांतून सर्वसामान्य लोकांना उपदेश करीत. त्यांच्या कीर्तनातून वेदवाणी व्यक्त होत असल्यामुळे धर्ममार्तंडांनी तुकारामांप्रमाणेच त्यांचा फार छळ केला.
![]() |
लाकडी खांबावरील नक्षीकाम |
मठातील पुराणिक, हरदास इत्यादींसाठी दरसाल अठरा होनांची तरतूदही केली होती यासंबंधीच्या सनदा उपलब्ध आहेत. शिवदिग्विजय या बखरीत मौनी महाराजांचा उल्लेख आढळतो. इतिहाससंशोधक कै. सरदेसाई, शेजवलकर इ. तज्ञांनी मौनी महाराज व शिवाजी यांच्या गुरुशिष्यसंबंधाला दुजोरा दिला आहे. आद्य छत्रपतींच्या पश्चात संभाजी, राजाराम आणि ताराबाई यांनीही मौनी बाबांच्या मठाच्या यथायोग्य परामर्श घेतला.
![]() |
| लाकडी खांबावरील नक्षीकाम (पावसाळ्यातील दृश्य ) |
मौनी महाराजांचा बहुतेक सर्व कोकणपट्टीत संचार होई. ते कसलाही भेदभाव पाळीत नसत. ते हयात असताना लांबलांबचे लोक त्यांच्या दर्शनास येत. १६८६ मध्ये त्यांनी पाटगाव येथे जिवंत समाधी घेतली, असे म्हणतात.
![]() |
मौनी महाराज समाधी |
त्यानंतर संभाजी महाराजांच्या पाठिंब्याने तुरुतगिरी हे (१७२८ पर्यंत) पीठपती झाले. तुरुतगिरींनी मौनींच्या समाधीपुढील सभामंडप, नगारखाना इ. इमारती बांधल्या. दरवर्षी रथसप्तमीपासून पुढे सहा दिवस पाटगाव येथे बाबांच्या पुण्यतिथीचा उत्सव होतो.
![]() |
प्रवेशद्वारा वरील नक्षीकाम |
![]() |
समाधी मंदिरासमोरीलमौनी बाबांची व त्यांच्या पीठाची परंपरा मराठे-ब्राह्मणेतरांची होती. कोल्हापूरच्या गादीवरील सर्वच छत्रपती या पीठाला फार मान देत. |
![]() |
शिवाजी राजेंना आशीर्वाद देताना मौनी महाराज |
राजर्षी शाहू महाराजांना वेदोक्त प्रकरणाच्या संदर्भात या पीठाचा पूर्वेतिहास अनुकूल वाटला. त्यांनी सदाशिवराव पाटील या मराठा पदवीधराला या पीठावर अधिष्ठित करून क्षात्रजगद्गुरू या नावाने शंकराचार्यांचे स्वतंत्र पीठ निर्माण केले.
छत्रपती शिवाजी महाराज्यांचे गुरु श्री मौनी महाराज हे त्या काळी विजापूरचा राजकारभार हाताळत होते. शिवाजी महाराज जेव्हा कर्नाटक राज्यामध्ये गेले असता त्यांची भेट मौनी महाराज्यांशी झाली.
सुंदर शिल्प
काही काळ उलटल्यानंतर मौनी महाराजांनी सर्व गोष्टींचा त्याग करून तपश्चर्येचा मार्ग अवलंबला.याच मौनी महाराजांना शिवाजी महाराजांनी आपले गुरु मानले.श्री.मौनी महाराजांच्या वास्तव्यामुळेच पाटगाव या ठिकाणाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले.
मौनी महाराज वास्तव्यास असलेल्या ठिकाणी एक नयनरम्य व अतिशय सुंदर कलाकुसर असलेला मठ उभारण्यात आला आहे.
मठाच्या छपरासाठी तांब्याचे पत्रे वापरण्यात आले आहेत. मठाच्या मागच्या बाजूस शिवाजी महाराज व श्री मौनी महाराज यांच्या भेटीचे ठिकाण आहे.शिवाजी राजे दक्षिणेच्या स्वारीवर जाण्याआधी आपले गुरु मौनी महाराज यांची भेट घेण्यासाठी पाटगाव येथे आले होते.
![]() |
श्री मौनी महाराजांच्या नावाने स्थापन झालेली शाळा श्री मौनी महाराज हायस्कूल &जुनिअर कॉलेज पाटगांव |
![]() |
| शिवाजी राजेंना आशीर्वाद देताना मौनी महाराज |
![]() |
मौनी महाराजांची फुलांनी सजवलेली समाधी |



















No comments:
Post a Comment
आपला अभिप्राय कळवा ब्लॉग ला पुन्हा भेट दया.
P. N. Desai